लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत ग्रामीण ग्रामीण कथाकार हिम्मत पाटील यांनी व्यक्त केले.


चिखली तालुका शिराळा इथं लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री हिम्मत पाटील बोलत होते.

यावेळी मनीषादेवी नाईक, चिखली च्या सरपंच शुभांगी कुरणे, मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर, पी.आर.वरेकर,जयसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कथाकार हिम्मत पाटील यांनी ” बटू ची मुंज ” हि कथा सादर केली.

अथर्व कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांचा चषक व प्रमाणपत्र देवून सन्मान केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. रेखा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन तनिष्का साळुंखे यांनी केले.