लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये बालिका दिन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये बालिका दिन साजरा करण्यात आला.


यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी चिखली विद्यानिकेतन चे प्राचार्य वरेकर सर यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केलीत. यावेळी खबाले सर यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. व कार्यक्रमाचे आभार मानले.