लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये वेशभूषा दिन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये वेशभूषा दिन उत्साहात संपन्न झाला.

वार्षिक स्नेहसंमेलन च्या अनुषंगाने या वेशभूषा दिन चे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये बालवाडी ते ८ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १ ली ते ४ थी असा लहान गट, तर ५ वी ते ८ वी हा मोठा गट असे दोन गट ,तर बालवाडी गट सुद्धा करण्यात आले होते.

त्यामुळे मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, सईबाई, फौजी, वारकरी, कोळी, धनगर अशा वेग वेगळ्या वेशभूषा केल्या होत्या.
या वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण विद्यानिकेतन चे टी. एस. पाटील सर, अमर पाटील सर यांनी केले.

य स्पर्धेत लहान गटात श्लोक मातेश विभूते याने प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात प्रतीक्षा रंगराव गायकवाड या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. बालवाडी गटात नेहारिका संग्राम पाटील या चिमुकलीने प्रथम क्रमांक पटकावला.