स्व. आम.संजयदादा यांना विनम्र अभिवादन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील हरितक्रांती चे जनक स्व.आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांच्या जयंती निमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

शाहुवाडी तालुक्याला लाभलेलं एक रत्न म्हणजे स्व. आमदार संजय दादा हे होत.
एकेकाळी सहा महिन्यात तालुका कोरडा व्हायचा. पाण्यासाठी बाया-बापड्यांना वणवण करावी लागत होती. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु असताना शेतीसाठी पाणी कुठून मिळणार, हा यक्ष प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर पडलेला असायचा.

परंतु दादांनी मंत्रिपदाच्या मोबदल्यात तालुक्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यामध्ये तालुक्यात सात लघु पाटबंधारे तलाव मंजूर करून आणलेत. आणि इथला शेतकरी सुधारू लागला. नगदी पिकांची उत्पादने तो आपल्या शेतात घेवू लागला.

तालुक्यासाठी जे जे शक्य होते, ते ते त्यांनी केले. यापुढे सुद्धा त्यांचे तालुक्याच्या विकासाचे आराखडे त्यांनी तयार केले होते. परंतु दुर्दैवाने अल्पावधीत त्यांचे निधन झाले, आणि तालुका विकासापासून पोरका झाला.
असे हे नेतृत्व लोकांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. पुनश्च त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.