भारतीय दलित महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती उत्सव संपन्न
बांबवडे : भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने बांबवडे तालुका शाहुवाडी इथं स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याचप्रमाणे स्त्रीमुक्ती च्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय दलित महासंघाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ,तसेच स्त्रीमुक्ती च्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शाहुवाडी तालुका अध्यक्ष आकाश कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहुवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड हे होते. या सर्व मंडळींच्या हस्ते लोकनियुक्त सरपंचांचे सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमास श्रीकांत कांबळे आप्पा, जिल्हाध्यक्ष बबलू चौगुले, बांबवडे चे माजी सरपंच सागर कांबळे, पोलीस पाटील बांबवडे चे संजय कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कांबळे वाघवेकर यांनी केले.