विविध सामाजिक प्रश्नांबाबत बहुजन वंचित कडून तहसीलदारांना निवेदन
बांबवडे : शाहुवाडी तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, प्रत्येक गावामध्ये लायब्ररी साठी प्रस्ताव तयार करणें, तालुक्यातील पाझर तलावातील पाण्याचे मोजमाप करून पाणी साठ्यातील ६० % सिंचनासाठी वापरण्यास संबंधितांकडून परवानगी मिळावी, तालुक्यातील पानंद रस्ते, पायवाटा काहीठिकाणी गायब झाल्या असून, सरकारी मोजणी द्वारे त्याचे निश्चितीकरण व्हावे.

याचबरोबर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गुटखा, गांजा, अवैध दारू, मटका, खाजगी सावकारी यांच्यावर कारवाई व्हावी, खाजगी दवाखान्यातील उपचाराचे दर निश्चित करावे, तसेच त्यासाठी एक समिती गठीत करावी, तालुक्यातील खनिज उत्खननाबाबत विशेष उपाय योजना आखावी, बेकायदेशीर उत्खनन त्वरित थांबवावे.

तालुक्यातील बौद्ध विहार यांची झालेली पडझड दुरुस्त करावी, तसेच अनेक अपूर्ण बौद्ध विहार यांची पुनर्बांधणी करावी, बांबवडे, मलकापूर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढावा, अशा विविध सामाजिक प्रश्नांबाबत हे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष आनंदा कांबळे, उपाध्यक्ष शुभम काळे, विजय कांबळे, कोषाध्यक्ष तुषार जाधव, सचिव सुरेश कांबळे, सह सचिव आनंदा कांबळे, आदी बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.