शित्तूर तर्फ मलकापूर इथं तोडलेल्या झाडांचा वनविभागाकडून पंचनामा
बांबवडे विशेष प्रतिनिधी ( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील रस्त्यालगत असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तोडलेल्या झाडांची वनविभागाच्या वतीने आज पंचनामा करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी शित्तूर तर्फ मलकापूर येथील रस्त्यालगत असलेली झाडे तोडण्यात आली आहेत. अशा आशयाची तक्रार वनखात्याकडे करण्यात आली होती. येथील काही राजकीय मंडळींनी या झाडांची तोड केली असल्याचे समजते. परंतु हि झाडे नक्की कोणी तोडली, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यानंतर याबाबत काय कारवाई होणार, अशी चर्चा ग्रामस्थांतून रंगत आहेत.