ओबीसी समाजाने संघटीत होवून अन्यायाचा प्रतिकार करावा – श्री दिगंबर लोहार
बांबवडे : सुतार-लोहार समाजाने शासनाच्या विवध योजनांचा लाभ घेवून, समाजाचा विकास साधावा, तसेच ओबीसी प्रवर्गात असल्याने, ओबीसी म्हणून संघटीत होऊन अन्यायाचा प्रतिकार करावा, असे मत ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी व्यक्त केले.

गोगवे तालुका शाहुवाडी इथं सुतार-लोहार समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री दिगंबर लोहार बोलत होते. या मेळाव्याचे आयोजन माजी सैनिक पांडुरंग लोहार यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी सुतार-लोहार समाज उन्नती संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष व्ही.डी. लोहार होते.
यावेळी दिगंबर लोहार पुढे म्हणाले कि, ओबीसी प्रवर्गात उच्चवर्गीय लोकांची होणारी घुसखोरी गांभीर्याने घेवून घुसखोरांना रोखले पाहिजे. यासाठी गावगाड्यातील बलुतेदार, अलुतेदार समाज घटकांचे गावपातळीवर संघटन करण्यासाठी सुतार-लोहार समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील दिगंबर लोहार यांनी केले.

यावेळी सुतार-लोहार समाज महिला अध्यक्षा मालती सुतार म्हणाल्या कि, सुतार-लोहार समाजातील महिलांनी सामाजिक, आर्थिक,उन्नतीसाठी संघटीत व्हावे.

सुतार-लोहार सखी मंच च्या अध्यक्षा रुपाली सातार्डेकर म्हणाल्या कि, महिलांनी आपली ताकद ओळखून संघटीत होवून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. या माध्यामतून आपला, व आपल्या समाजाचा विकास साधावा.

ओबीसी जनमोर्चाच्या संघटक अश्विनी सुतार म्हणाल्या कि, ओबीसी म्हणून समाजातील महिलांनी संघटीत होवून, ओबीसी समाजातील विविध जातींमधील महिलांचे बचत गट स्थापन करावेत. महिलाच समाजाला योग्य दिशा दाखवू शकतात.

यावेळी माजी सैनिक पांडुरंग लोहार, पोलीस पाटील सदाशिव सुतार, आकाश सुतार, सचिन सुतार, सुखदेव सुतार यांनी मनोगते व्यक्त केलीत.

या मेळाव्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. अंजना लोहार, सुचिता कोरे, विलास लोहार, भगवान लोहार, निर्मला लोहार, महेश सुतार, नितीन लोहार, दीपक लोहार, धनाजी लोहार, अमोल लोहार आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन दिनकर लोहार यांनी केले. आभार पोलीस पाटील राजेंद्र लोहार यांनी मानले.