लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी एकमेकांना तसेच गुरुवर्यांना तिळगुळ देवून आशीर्वाद घेतले.

यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख सौ. शोभाताई भोसले मॅडम यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगताना तिळगुळ वाटपाचे महत्व सांगितले.
यावेळी सहा. शिक्षक युवराज खबाले, साधना पाटील, कांबळे मॅडम यांनी मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळेतील सहा. शिक्षिका सौ. प्राजक्ता यादव मॅडम उपस्थित होत्या. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. आपल्या सणांचे महत्व पटवून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री डी.पी. गवळी सर उपस्थित होते. गवळी सरांनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता सौ. भोसले मॅडम यांनी आभार मानल्यानंतर केली.