शाहुवाडी तालुक्यातील पाणंद रस्त्यांसाठी खासदार फंडातून ७ कोटी रुपये मंजूर- श्री देसाई
बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी खासदार धैर्यशील माने यांनी ३४ कोटी रु.मंजूर केले असून त्यापैकी शाहुवाडी तालुक्यातील पाणंद रस्त्यांसाठी ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले कि, तालुक्यासाठी अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, लोककलाकार महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याद्वारे तालुक्यातील पर्यटनस्थळे उजेडात आणण्याचा देखील प्रयत्न असणार आहे.

महाराष्ट्रातील लोककला दिवसेंदिवस कालबाह्य होत चालल्या आहेत. त्या आपल्या नव्या पिढीला समजाव्यात, हा हेतू या महोत्सावामागे आहे. यामध्ये वासुदेव, पिंगळा जोशी, नंदीवाले, बहुरूपी, अशा अनेक कलाकारांना समाजापुढे आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. असेही श्री विजयसिंह देसाई यांनी सांगितले.

दरम्यान शाहुवाडी तालुक्यात मंजूर झालेले पाणंद रस्ते- परखंदळे पैकी पिंपळेवाडी काळवाट पाणंद, पाटणे येथील गुरवकी पाणंद, खोतवाडी येथे शिवरीची पाणंद, कोतोली ते वारणा नदी पाणंद, उखळू ते मठ ते नदी पाणंद, खेडे ते मेन रोड ते नाव गोंड पाणंद, थावडे ते हरिजनवाडा ते जळखपी पाणंद, कांडवण ते स्मशानभूमी पाणंद, पळसवडे ते सिडवे गल्ली, ते लोहारवाडी पाणंद, येलूर ते पायरवाडी ते चौगुले मळा पाणंद, नांदगाव येथील खराडेवाडी ते भैरी देवालय पाणंद, पेरीड येथील नावेचा माळ (जुना रस्ता ) पाणंद, आरूळ येथील मेन रोड पासून स्मशानभूमीकडे जाणारी पाणंद, माण येथील पाथवडे पाणंद, परळे येथील रुतून पाणंद.

या प्रत्येक पाणंद रस्त्यासाठी १ कि.मी. चे अंतर मंजूर करण्यात आले असून, यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती सुद्धा श्री देसाई सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच तशा आशयाचे पत्र सुद्धा पत्रकारांना देण्यात आले.