कायदा आणि जनतेच्या भावनांचा समन्वय राखून पोलीस प्रशासन राबविले जाईल- श्री प्रकाश गायकवाड ( पोलीस निरीक्षक)
शाहुवाडी प्रतिनिधी : कायदा आणि येथील नागरिकांच्या भावना यांचा समन्वय साधून , पोलीस प्रशासन राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल. यासाठी सर्वच स्तरातील नागरिकांना स्थान देवून, स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने वाहतूक कोंडी निर्मूलनाचा आमचा प्रयत्न असेल, असे मत येथील प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

शाहुवाडी पोलीस ठाणे येथे पत्रकारांशी औपचारिक रीत्त्या बोलताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वप्रथम पोलीस कर्मचारी बंधूंशी समन्वय साधला आहे. त्यांच्या सहकार्याने ते तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविणार आहेत. पत्रकारांनी शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्र. बाबत विचारले असता, त्यावर लवकरच कार्यवाही होईल. असेही श्री गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी श्री गायकवाड पुढे म्हणाले कि, इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. यासाठी येथील स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी मंडळ, पत्रकार, पदाधिकारी, आणि विविध स्तरातील प्रतिनिधींना एकत्र बोलवून त्यावर समन्वय समिती नियुक्त करण्यात येईल, त्यासाठी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेवून, हि समिती गठीत करण्यात येईल. त्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल. यासाठी पत्रकारांचे सहकार्य मोलाचे आहे. ते त्यांनी करावे , असेही आवाहन श्री गायकवाड यांनी पत्रकरांशी बोलताना केले. तसेच बांबवडे चौकी इथं पुरेसा पोलीस फौजफाटा दिला जाईल. असेही श्री गायकवाड यांनी सांगितले.

शाहुवाडी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा शंभर टक्के प्रयत्न असेल, असेही श्री गायकवाड म्हणाले.