तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सद्गुरू आश्रम शाळा शिराळा इथ संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सद्गुरू आश्रम शाळा शिराळा इथ संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शनात लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी Model of polution Control, Speed Breakar , वीज निर्मिती अशी शैक्षणिक साधने तयार करून प्रदर्शनात सादर केली होती.

यावेळी तालुकास्तरीय विज्ञान मंडळ चे अध्यक्ष खोत सर, शिराळा तालुका विस्तार अधिकारी विष्णू दळवी सर यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली.

यावेळी विज्ञान प्रदर्शनाला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राजक्ता यादव, साधना पाटील, मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर संग्राम पाटील सर उपस्थित होते.