भिडेवाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे – श्रीकांत कांबळे
शाहुवाडी प्रतिनिधी : पुणे येथील भिडे वाडा इथं महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीसाठी भारतीय दलित महासंघ च्या वतीने शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणाचे नेतृत्व भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा इथं मुलींची पहिली शाळा सुरु केली. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून पुरुषांप्रमाणे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरावस्था झाली आहे. सदर वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वाड्याला गौरवशाली इतिहास आहे. तरी शासनाने महात्मा जोतीबा फुले, व सावित्रीबाई फुले यांचे याठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी देखील भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या आंदोलनात आकाश कांबळे, अनिरुद्ध कांबळे, सचिन कांबळे, दयानंद कांबळे,कृष्णा कांबळे, सिद्धार्थ बनसोडे, किरण कांबळे, संजय बनसोडे, अभिजित गोसावी, संतोष कांबळे,आदींसह भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.