लोकनेते स्व.फत्तेसिंगराव नाईक यांची जयंती संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा आणि पंचक्रोशीच्या हरितक्रांती चे प्रणेते व विश्वासराव नाईक सह.साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. फत्तेसिंगराव नाईक (आप्पा ), व स्व. लीलावती नाईक (आईसाहेब ) यांच्या प्रतिमेला लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विनम्र अभिवादन केले.

स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या जयंती निमित्त हा अभिवादन कार्यक्रम लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये संपन्न झाला.

स्व. फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) यांनी दूरदृष्टी ठेवून इथला शेतकरी सधन झाला पाहिजे. त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे , या हेतूने विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्याची निर्मिती केली. या कारखान्याच्या अनुषंगाने उपपदार्थ निर्माण करण्यासाठी कारखाने निर्माण केले. यामुळे तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आणि एकेकाळी गरिबीत होरपळणारा शेतकरी समृद्ध झाला.

अशा महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करून, आपण समाजाला एक राजमार्ग दाखवीत आहोत. त्यांच्या कर्तुत्वाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत आहोत. ज्या माध्यमातून समृद्ध विचारांची नवी पिढी निर्माण होईल., असे मत शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शाळेचा सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.