शाहुवाडी चे माजी उपसभापती आनंद पाटील यांच्याकडून हवेत गोळीबार
बांबवडे : शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती श्री आनंद उर्फ बबन पाटील यांनी मेणीपैकी आटूगडेवाडी इथं एका धाब्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पिस्तुल मधून फायरिंग केले. याबाबत त्यांच्यावर कोकरूड तालुका शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. हि घटना सोमवार दि. २३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यातून तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, शिराळा तालुक्यातील मेणी पैकी आटूगडेवाडी येथील खिंडीत असलेल्या एका धाब्यावर कराड तालुक्यातील जयेश जयवंत निकम वय २६ वर्षे हे आपल्या मित्रांसाहित जेवायला आले होते. दरम्यान त्याचवेळी शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती आनद उर्फ बबन पाटील हेदेखील तिथे जेवायला आले होते. दरम्यान जयेश याला पाटील यांचा धक्का लागला. त्यामुळे झालेल्या बाचाबाची चे रुपांतर हाणामारीत झाले. त्या वेळी रागापोटी पाटील यांनी हवेत गोळीबार केल्याचे समजते.
सदर घटनेची फिर्याद जयेश निकम यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान आनद पाटील तसे स्वभावाने मितभाषी आहेत. अशी घटना त्यांच्याकडून कशी घडली याचे आश्चर्य शाहुवाडी तालुक्यातून व्यक्त होत आहे.