शाहुवाडी त स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात संपन्न
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शाहुवाडी इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

प्रारंभी दिवंगत ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका प्रमुख दत्ता पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिवसेने चे जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.

शाहुवाडी तालुक्यात अनेक गावातून शिवसैनिकांच्या वतीने साहेबांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी दिनकर लोहार, दत्ता पोवार नामदेव गिरी आदींनी मनोगते व्यक्त केलीत. दरम्यान उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

यावेळी शाहुवाडी पंचायत समिती च्या माजी सभापती डॉ.स्नेहा जाधव, सौ. पूनम भोसले, माजी सरपंच धोंडीराम सोने, सुहास लाड, डॉ. वसंत गायकवाड, हणमंत कवाळे, बळीराम ठाणेकर, प्रकाश खोत, योगेश कुलकर्णी, आनंदा पोवार, अलका भालेकर, निवास निकम, नारायण सुतार,आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.