सरूड – सागाव रस्त्यावर ट्रॅक्टर चा अपघात : चालक ठार
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी इथ सरूड – सागाव रस्त्यावर एका ट्रॅक्टर चा अपघात होवून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची फिर्याद मुकादम बाळू भगवान धोत्रे राहणार राजपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार आज. दि.२५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजण्यापूर्वी ट्रॅक्टर चालक दिलीप हिरामण पवार वय ३५ वर्षे राहणार खांडवी तालुका गेवराई जिल्हा बीड, हा ट्रॅक्टर चालक हयगयीने ट्रॅक्टर क्र. एम.एच.२३ बीसी २९४५ , चालवत असताना, सरूड – सागाव रस्त्यावर घोलप वस्ती जवळ दत्ता बाळू भालेकर यांच्या शेतात ट्रॅक्टर गेला. या अपघातात चालकाचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला आहे.

याबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सावत अधिक तपास करीत आहेत.