वुशू स्पर्धेत आदर्श मोहिते ने गोल्ड तर सुमेध ने सिल्व्हर मेडल :वारंगे कॉलेज च्या विद्यार्थ्यांची कामगिरी
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : नांदेड इथं संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर हायस्कूल व ग.रा.वारंगे ज्युनिअर कॉलेज चे आदर्श मोहिते यांनी गोल्ड मेडल, तर सुमेध कांबळे यांनी सिल्व्हर मेडल मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन .

नांदेड इथं २१ ते २४ जानेवारी २०२३ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये मलकापूर येथील मलकापूर हायस्कूल व ग.रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज येथील ८० किलो वजनी गटात गोल्ड मेडल विजेता आदर्श वसंत मोहिते व ५२ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल विजेता सुमेध बाबासो कांबळे यांची मलकापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी प्राचार्य व्ही.बी. साठे, उपप्राचार्य डी.वाय. कुराडे, पर्यवेक्षक एस.व्ही. कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा शिक्षक सुकुमार आडके व जी.एन. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.