” शेळके कॉम्प्लेक्स ” च्या त्रिवेणी कंपनी च्या चार संचालकांवर फसवणुकीची फिर्याद
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथ शेळके कॉम्प्लेक्स निर्माण केलेल्या बिल्डर कंपनी मधील चार संचालकांवर ५ कोटी ची फसवणूक केल्याची फिर्याद त्यापैकी संचालक प्रवीण घाडगे यांनी शाहुवाडी पोलीस ठाणे इथ केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ साली त्रिवेणी बिल्डर अँड डेव्हलपर्स प्रा.लि. नावाची कंपनी पाच संचालकांनी मिळून स्थापन केली. सदर कंपनीने बांबवडे इथ अंबीरा ओढ्याशेजारी एक प्रोजेक्ट विकसन करारपत्र अंजनाबाई शेळके यांच्याकडून करून घेवून सुरु केला. यातील चार आरोपींनी कंपनीच्या नावे बोगस ठराव करून, त्या ठरावावर फिर्यादीची खोटी सही करून, त्या आधारे पुरवणी विकसन करार पत्र, व वटमुखत्यार पत्र तयार करून, या प्रोजेक्ट मध्ये रहिवासी, तसेच कमर्शिअल गाळे विक्री केले. त्या माध्यमातून आलेली रक्कम फिर्यादी यांना न देता, खोटा खर्च दाखवण्यात आला. तसेच कंपनीचे खाते नुकसानीत आहे, असे दाखविण्यात आले. यातून अंदाजे ५ कोटी रुपयांची कंपनीची फसवणूक केली आहे. असा आरोप फिर्यादी प्रवीण घाडगे यांनी केला आहे. यामध्ये फसवणूक करणारे आरोपी १. अमित जाधव, २. हरीश साळुंखे, ३. राम गायधर, ४. रवींद्र खाडे या चार आरोपींविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान सदर घटनेबाबत संचालक अमित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, अशाप्रकारची कोणतीही फसवणूक आम्ही केलेली नाही, असे त्यांनी एसपीएस न्यूज शी मोबाईल वरून बोलताना सांगितले.