तरुणांच्या हृदयातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व : श्री प्रवीण जानकर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील फायटर ग्रुप चे समर्थक श्री प्रवीण जानकर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तसेच पंचक्रोशीतून सुद्धात्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रवीण जानकर हे तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्व, नेहमीच अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे असते. ते स्वभावाने मितभाषी असले, तरी मैत्रीसाठी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. याचबरोबर सामाजिक पातळीवर देखील त्यांची उतरण्याची नेहमीच तयारी असते.

बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांची असलेली तळमळ वाखाणण्याजोगी आहे. सध्या समाजात तरुणाई बिघडत चालली आहे. असा आरोप वडीलधारी मंडळींकडून नेहमीच होत असतो. पण या गोष्टीला प्रवीण हे अपवाद आहेत. त्यांची तरुणांना व्यवसायात दाखल होण्याची मागणी आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता, व्यवसाय करावा, अशी त्यांची धारणा आहे.

एकंदरीत काय समाजाला आवश्यक असणारी तरुण पिढी निर्माण व्हावी, असा त्यांचा मानस आहे. समाजावर अन्याय होवू नये, यासाठी त्यांची धडपड असते. असे हे व्यक्तिमत्व जरी प्रकाशात नसले, तरी तरुण मित्रांमध्ये मात्र ते नेहमीच त्यांच्या हृदयात असतात. अशा या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.