बांबवडे च्या धनंजय निकम ने ” खेलो इंडिया ” कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला : पंचक्रोशीतून अभिनंदन
बांबवडे : महाराष्ट्र राज्य तिरंगा ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांबवडे येथील धनंजय अर्जुन निकम यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. तशा आशयाचे प्रशस्तीपत्रक त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

पुणे इथं झालेल्या खेलो इंडिया च्या माध्यमातून झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये धनंजय अर्जुन निकम यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल बांबवडे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.