योगेश कुलकर्णी यांची शिवसेनेच्या शाहुवाडी तालुका उपप्रमुख पदी निवड : तालुक्यातून अभिनंदन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील करंजोशी येथील निष्ठावंत शिवसैनिक श्री योगेश कुलकर्णी यांची शिवसेनेच्या शाहुवाडी तालुका उपप्रमुख म्हणून नियुक्ती झालेबद्दल, त्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स तसेच एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन. या निवडीबद्दल त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री योगेश कुलकर्णी हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सतत कार्यरत राहिले आहेत. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात ते उत्स्फुर्तपणे सहभागी असतात. तसेच पक्षाने टाकलेली जबाबदारी पेलण्यास ते नेहमी तयार असतात. त्यांची झालेली निवड उशिरा का होईना, पण पक्षाने त्यांच्या निष्ठेची केलेली कदरच म्हणावी लागेल.

पुनश्च योगेश कुलकर्णी यांचे मनापासून अभिनंदन,आणि त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छा