पर्यटन महोत्सवात रंगल्या सहाशे ” लोककला “
शाहुवाडी प्रतिनिधी :शाहुवाडी तालुक्यातील आंबा इथं पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित विविध लोक कलांचा सोहळा चांगलाच रंगला होता.

राधानगरी येथील दहा वर्षीय अपूर्वा एकवडे हिने आपल्या शाहिरीने उपस्थितांची मने जिंकली. समाधान कांबळे यांनी तमाशातील गण गवळणी चे बहारदार सादरीकरण केले.

आंबा पर्यटन महोत्सवाचा उद्देशच यासाठी होता कि, आपल्या लोक कलांची आपल्या नव्या पिढीला ओळख व्हावी. यामध्ये पोतराजा पासून जोगवा, भोप्या, गोंधळी, भेदिक, कलगी तुरा, सोंगी भजन,कीर्तन, गजनृत्य, हलगी, जाकडी, अशा अनेक कलांची पर्वणी च इथं सादर करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र , कोकण भागातून सहाशे कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कला सादर करण्यात आल्या. कासारवाडी येथील श्रीराम गुरु कुलूम यांनी मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. आचार्य विशाल निकम यांनी विविध खेळ सादर केले.

यावेळी बचत गटांनी ग्रामीण खाद्य पदार्थांची मेजवानी दिली.

शाहुवाडी तालुकाप्रमुख विजयसिंह देसाई, यांच्या हस्ते कलाकारांना गौरव चिन्ह देवून गौरविण्यात आले. पन्हाळा येथील पर्णाल इतिहास संशोधन मंडळाने ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरवले होते. महोत्सवाचे प्रमुख पंच म्हणून सुरभीचे प्रा. आनंद गिरी, शाहीर शामराव खडके यांनी काम पाहिले.

यावेळी विजयसिंह देसाई, सरपंच समता वायकूळ, उपसरपंच सुरेश कोळापटे, आनंद भोसले, अमोल नांगरे, विश्वजित देसाई, इंद्रजीत देसाई, पत्रकार राजू कांबळे, सुरेश गुर, आनंदा अस्वले, महिला प्रमुख आशाराणी पाटील, आदींसह तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.