भेडसगाव इथं आज मोफत आरोग्य शिबिराचे आमदार कोरेंच्या हस्ते उद्घाटन
बांबवडे : भेडसगांव तालुका शाहुवाडी इथं आज दि..३१ जानेवारी २०२३ रोजी आरोग्य तपासणी, उपचार, व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर प्रशांत चौगुले व मित्र परिवार ,रणवीर पाटील युवा शक्ती, वाघाची तालीम भेडसगाव यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे, यांच्या शुभ हस्ते होणार असून, कार्यक्रमास गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, के.डी.सी.सी. बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, व भेडसगाव चे माजी सरपंच विजय दादा पाटील भेडसगावकर, उदय साखर चे माजी संचालक संजय चौगुले, पल्स हॉस्पिटल च्या डॉ. सौ. मीरा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर चे शिबीर निलकंठेश्वर मंदिर ,भेडसगाव इथं संपन्न होत आहे.

सदर च्या शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी मोफत करण्यात येणार असून, शिबिरातून प्रकाश हॉस्पिटल उरुण इस्लामपूर मध्ये येवून उपचार घेणाऱ्या रुग्णांना सर्व उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. हॉस्पिटल मध्ये मोफत एकस-रे, सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी करण्यात येईल.

सदर प्रकाश हॉस्पिटल मध्ये आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग असून, अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा प्रशस्त जागेत हॉस्पिटल आहे. इथं महात्मा जोतीराव फुले योजना, वाजपेयी श्री आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना, प्रकाश आरोग्य योजना, राज्य सहकारी कर्मचारी आरोग्य योजना उपलब्ध आहेत.

सदर च्या शिबिरास रुग्णांनी भेट देवून, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रशांत चौगुले ७०२८४९५१५२, धर्मेंद्र कारंडे ९६२३६९६१५६, राहुल पाटील ७७२०९३१८५९, साहिल पाटील ७२१९०९०७७४ यांनी परिश्रम घेतले अधिक माहितीसाठी या मंडळींशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.