भेडसगाव च्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन कर्णसिंह गायकवाड यांच्या हस्ते संपन्न
बांबवडे : प्रत्येक गावातील तरुण पिढीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपावी, ज्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला भरमसाट उपचार बिलांपासून मुक्ती मिळेल. असे मत गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी व्यक्त केले.

भेडसगाव तालुका शाहुवाडी इथं निळकंठेश्वर मंदिरात भव्य आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन प्रशांत चौगुले, धर्मेंद्र (भोला ) कारंडे, राहुल पाटील, साहिल पाटील, रणवीर पाटील युवा शक्ती, वाघाची तालीम भेडसगाव यांनी केले होते. यासाठी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरुण – इस्लामपूर या या सक्षम हॉस्पिटल ची डॉक्टर टीम यांनी या आरोग्य शिबिराचे काम पहिले. या शिबिराचे उद्घाटन गोकुळ चे संचालक युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कर्णसिंह गायकवाड यांनी स्वत: देखील रक्तदान करून, सामाजिक बांधिलकी त मोलाचे योगदान दिले.

यावेळी रक्तदान देखील करण्यात आले. अनेक तरुणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी मधुमेह, तसेच हृदय विकार आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच शस्त्रक्रियेसाठी कान, हर्निया, अॅपेंडिक्स, मुतखडा असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अशा रुग्णांना उद्या दि.१ फेब्रुवारी सकाळी ८.०० वाजता प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर ला नेण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबीर प्रसंगी भेडसगाव चे माजी सरपंच विजय पाटील दादा, डॉ. सौ. मीरा पाटील, रणवीरसिंग गायकवाड, संजय चौगुले, सुरेश चौगुले, माजी उपसरपंच ज्ञानदेव गुरव तात्या, आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.