मच्छीमार संघाच्या संचालक पदी पांडुरंग कदम यांच्या निवडीबद्दल सत्कार संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुका शिराळा येथील महादेव पांडुरंग कदम नाना हे महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मुंबई येथील पुणे विभागातून संचालक पदी भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा स्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेज शिराळा चे प्राचार्य संदीप कदम, उपप्राचार्य सौ. मीनाक्षी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सौ.अर्चना कदम, साक्षी कदम उपस्थित होते.