स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शिराळा चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शिराळा इथं वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईभक्त साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप कदम यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जर्नलिस्ट फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री राजीव लोहार, तसेच भास्कर भूषण च्या संपादिका सौ. मनीषा लोहार, हर्ष हॉटेल व रेस्टॉरंट नेर्ले चे मालक श्री विजय कदम, सौ. अर्चना कदम, संस्थेचे संचालक शरद कदम, संतोष मोरे, रमेश शिंदे, अॅड. बाबालाल मुजावर उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत व सत्कार प्राचार्या सौ. मीनाक्षी कदम यांनी केले.
यावेळी शिराळा नगरपंचायत चे मुख्याधिकारी योगेश पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे संचालक महादेव कदम यांनी मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमामध्ये २ ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमास सौ. रेश्मा जाधव, नम्रता पाटील, रूपल कदम, मयुरी घाटगे, सौ.उज्वला कदम, हेमलता महामुनी, रोहित कुंभार, अक्षय माने आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन काळे यांनी केले, तर आभार साक्षी कदम यांनी मानले.