श्री अमरसिंह हंबीरराव पाटील ( भैय्या ) यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा- श्री संपत पाटील, ए.डी. पाटील शिंपे
श्री अमरसिंह हंबीरराव पाटील ( भैय्या ) यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ए.डी. पाटील ( आप्पा ), संपत पाटील , ए.डी. पाटील आप्पा प्रेमी ग्रुप, अमरसिंह पाटील युवा शक्ती शिंपे,व शिंपे ग्रामस्थ यांच्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. असे मत शिंपे तालुका शाहुवाडी येथील संपत पाटील, ए.डी.पाटील आप्पा यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

यावेळी संपत पाटील पुढे म्हणाले कि, भेडसगाव गावचे माजी सरपंच श्री अमरसिंह हंबीरराव पाटील, हे तरुणाई साठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी सामान्य जनतेसाठी भेडसगाव इथं अनेक विकास कामे गावाच्या विकासासाठी आणली आहेत. तरुणाई म्हणजे भविष्य काळातील उर्जा आहे. या उर्जेचे स्त्रोत म्हणजे अमरसिंह पाटील भैय्या आहेत. हि उर्जा अमरसिंह पाटील युवा शक्ती या ग्रुप च्या माध्यमातून तरुणाई साठी प्रेरणा स्त्रोत बनत आहे,

अमरसिंह भैय्या हे केवळ भेडसगाव साठी आदर्श नसून संपूर्ण तालुक्यात तरुणाई ला एक आदर्श बनणार आहेत. अशा या प्रेरणास्त्रोत ला उदंड आयुष्य लाभो. कारण हेच आपल्या तालुक्याचे भविष्य निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहेत.
पुनश्च अमरसिंह भैय्या यांना हार्दिक शुभेच्छा. असेही श्री संपत पाटील यांनी सांगितले.