माजी आमदारांनी जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले – आमदार डॉ. विनय कोरे
शाहुवाडी प्रतिनिधी : माजी आमदारांनी येथील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. खोटा प्रचार करून, राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विकासाचे राजकारण करावे, असे मत विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले आहे.

शाहुवाडी तालुक्यातील आंबर्डे पैकी रणवरेवाडी येथील धरणाच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे उपस्थित होते.

आंबर्डे पैकी रणवरेवाडी इथं ४६ एम.सी.एफ.टी. क्षमतेचे धरण बांधण्यात आले. या धरणाचे पाणी पूजन आमदार कोरे, कर्णसिंह गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार कोरे पुढे म्हणाले कि, आंबर्डे पंचक्रोशीत हे फार मोठे काम पूर्ण झाले आहे. यामुळे सहा गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. या धरण निर्मिती मध्ये येथील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे, असेही आमदार कोरे यांनी सांगितले.

यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर म्हणाले कि, विरोधक धरण संदर्भात खोट्या अफवा पसरवत आहेत. धरणाच्या उभारणीत निश्चित पारदर्शकता आहे.
यावेळी गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड, माजी सरपंच सुर्यकांत पाटील, रंगराव खोपडे, माजी सभापती सुभाषराव इनामदार, पंडितराव नलवडे, महादेवराव पाटील, आदी मंडळींनी आपली मनोगते व्यक्त केलीत

या धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, अशा शेतकऱ्यांचा तसेच ठेकेदार आनंदराव पाटील यांचा सत्कार आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी पं.समिती सदस्य अमरसिंह खोत, पी.डी. पाटील, माजी सरपंच दीपक जाधव, बाबा लाड, ज्ञानदेव वरेकर, बाळासाहेब गद्रे, आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.