विशाळगड इथं बेवारस प्रेत : २ फेब्रुवारी ची घटना : नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधावा
बांबवडे : विशाळगड तालुका शाहुवाडी इथं बेवारस प्रेत आढळून आले आहे. अशा आशयाची वर्दी उदय गोविंद जंगम वय ३५ वर्षे राहणार विशाळगड तालुका शाहुवाडी यांनी शाहुवाडी पोलीस ठाणे इथं दिली आहे.

सदर बेवारस प्रेताचे नातेवाईक अद्याप आढळून आलेले नाहीत, तरी सदर प्रेताचे नातेवाईक यांनी प्रेताची ओळख पटविण्यासाठी शाहुवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

दरम्यान विशाळगड येथील एका झोपडीत मयत कृष्णा भगवंत खुराडे वय अंदाजे ६५ वर्षे, राहणार विशाळगड तालुका शाहुवाडी हे २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या झोपडीत मयत अवस्थेत आढळून आले आहेत. सदर मयत इसम चे नातेवाईक कोणी असल्यास त्यांनी शाहुवाडी पोलिसांशी संपर्क साधावा,

अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहेत.