खाजगी कंपनी चे सरकारी जागेत अतिक्रमण ? – आंबा येथील घटना
मलकापूर प्रतिनिधी आंबा तालुका शाहुवाडी इथं आंबा – विशाळगड रस्त्यावर आंबा येथील खाजगी कंपनीने रस्त्यावर लोखंडी खांब रोवून अतिक्रमण केले आहे. असे असतानाही सर्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यावर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आंबा – विशाळगड रस्त्यावर एका खाजगी कंपनीची जागा आहे. या कंपनीने आपल्या जागेभोवती तारेचे कुंपण केले आहे तरीदेखील त्या बाहेर जावून त्यांनी रस्त्यावर लोखंडी खांब लावले असून, या माध्यमातून रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असताना ग्रामस्थांनी या गोष्टीला विरोध करीत काम बंद पाडले आहे.

या अतिक्रमणाचा त्रास पावशी व वाहन धारकांना होत आहे. या अतिक्रमणाचे धाडस कंपनी कसे करू शकते ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनेची चौकशी करून कंपनीवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.