यशवंत इंटरनॅशनल डोनोली व यशस्वी फौंडेशन चे विविध कार्यक्रमांचे आयोजन
यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोनोली इथं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीं दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी यशस्वी फौंडेशन च्या वतीने हळदी कुंकू समारंभ, श्री गजानन महाराज प्रकट दिन च्या अनुषंगाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे.
सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिन निमित्त यशस्वी फौंडेशन कोडोली यांच्या वतीने भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित केले आहे. तरी शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील सर्व महिला, बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, याना यशस्वी फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.विनिता जयंत पाटील यांच्याकडून आमंत्रण देण्यात येत आहे.

तसेच या दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये रांगोळी, मेहंदी, चित्रकला, क्राफ्ट आदी विविध प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

याच बरोबर दि. १५ फेब्रुवारी रोजी शाळेचे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सादर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कलर्स मराठी वाहिनी वरील जीव माझा गुंतला या सीरिअल मधील अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर तसेच कलर्स मराठी क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री युवराज घोरपडे सर व त्यांची टीम उपस्थित राहत आहेत.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील आईसाहेब, व संस्थेच्या विश्वस्त सौ विनिता जयंत पाटील यांनी शाळेच्या सर्व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तरी सदरच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य श्री. सचिन जद सर यांनी केले आहे.