भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल च्यावतीने ८ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर- डॉ. दिलखुष तांबोळी
बांबवडे : भास्कर आयुर्वेद हॉस्पिटल बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून, महिलांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. दिलखुष तांबोळी यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये डॉ. सौ. वहिदा तांबोळी एम. डी. आयुर्वेद या रुग्णांना तपासतील, व आरोग्यविषयक सल्ला देतील. शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. पाळीच्या तक्रारी, पिसीओडी, फायब्रॉईड, अंगावरून तांबडे जाणे, विनाकारण वजन वाढणे, अंगावरून कमी जाणे, व त्यामुळे वजन वाढणे, गालावरती लव येणे, केसांचे विकार, सौंदर्य विषयक इतर तक्रारी – पिंपल्स, चेहऱ्यावर डाग पडणे, चेहऱ्यावर खड्डे पडणे, अंगावर पांढरे चट्टे असणे, डोळ्याखालील काळी वर्तुळे, चेहऱ्यावर लव असणे, केसात कोंडा होणे, केस गळणे, केस दुभंगणे, थायरॉईड, कंबर दुखी, पाठदुखी, मणका सरकणे, चकती सरकणे, मान दुखणे, मान अवघडणे, वरचेवर चक्कर येणे, हातापायांना मुंग्या येणे, पाय सुंद होणे, सकाळी कंबर ताटणे या विकारावर तपासणी तसेच सल्ले देण्यात येतील. याचबरोबर गर्भवती महिलांसाठी विशेष तपासणी, व वंध्यत्वाचा त्रास असलेल्या महिला वंध्यत्व म्हणजेच मूल न होणे, गर्भाशय लहान असणे, बिजवाहीन्या बंद असणे, बीज तयार न होणे, बीज न फुटणे, बीज लहान असणे, हार्मोन चे विकार, जुनाट सर्दी, जुनाट पोटदुखी कोलायटीस, मुतखडा, मधुमेह अशा तक्रारी असलेल्या महिलांनी या शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा.

याशिवाय या शिबिरात मोफत साखर तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त शिबिराच्या दिवशी महिलांकरिता हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांना केसांचे तेल, व फेस पॅक मोफत देण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना औषध व पंचकर्म उपचारांवर दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे.
शिबिराचे स्थळ बांबवडे येथील गाडवे बिल्डींग, बांबवडे ग्रामपंचायत समोर बांबवडे – मलकापूर रोड, बांबवडे तालुका शाहुवाडी जी. कोल्हापूर. शिबीर बुधवार दि.८ मार्च २०२३ रोजी दुपारी तीन ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. अशी माहिती डॉ. दिलखुष तांबोळी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली. नाव नोंदणी साठी ७२७६००९०५१, ८४८५००९०५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.