मुटकलवाडी च्या बाळू लाड ला वन विभागाकडून अटक
मलकापूर प्रतिनिधी : परळे पैकी मुटकलवाडी येथील बाळू लाड यास वनविभागाने शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या कारणावरून अटक केली. त्याला मलकापूर-शाहुवाडी न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

परळे पैकी मुटकलवाडी येथील बाळू लाड हा खांद्यावर बंदूक घेवून जंगलात फिरताना, वनविभागाच्या छुप्या कॅमेऱ्यात आढळून आला. यावरून त्याची चौकशी केली असता, त्याने उडवा-उडवी ची उत्तरे दिली. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार घोळसवडे येथील जंगल क्रमांक १०१९ मध्ये वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.

या जंगलात बाळू लाड हा खांद्यावर बंदूक घेवून शिकार करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळला.

मलकापूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले , वनपाल रशीद गारदी, वनरक्षक आबासाहेब परीट, साधू कांबळे अधिक तपास करीत आहेत.