गोगवे इथं ट्रक व दुचाकी च्या अपघातात एक ठार तर एक जखमी : दोघेही सावे येथील रहिवाशी
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : गोगवे तालुका शाहुवाडी येथील करीमशहावली बाबा दर्गाह जवळ ट्रक आणि दुचाकी चा अपघात होवून सावे येथील एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. हि घटना आज दि. २ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजल्यानंतर घडली असल्याचे, घटनास्थळावरून समजते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार करीमशहावली बाबा दर्गाह जवळ कोल्हापूर दिशेला निघालेला ट्रक क्र.एम.एच.११ ए एल ५९५५ आणि दुचाकी क्र. एम.एच.०३ यु. २२९८ यांची धडक झाली. दुचाकीस्वार हे बांबवडे येथून भाजी घेवून सावे इथं त्यांच्या गावी निघाले होते. हि धडक एवढी जोरदार होती कि, दुचाकी वरील राजाराम सखाराम पाटील वय ५० वर्षे अंदाजे ह्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल बंडू खोत वय ४० वर्षे अंदाजे हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते.