शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ धडाडणार : खा. संजय राऊत यांची आज सरुडात जाहीर सभा
बांबवडे :सरूड तालुका शाहुवाडी इथं शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ असलेले खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा, व नवोदित सरपंच सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमास तमाम जनतेने उपस्थिती लावावी, असे आवाहन माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केले आहे.

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेले राजकारण अवघ्या जनतेला माहित आहे. या राजकारणात शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबांची बाजू लावून धरणारे आणि सत्ताधाऱ्यांचे अवगुण समोर आणणारे अध्वर्यू खासदार संजय राऊत शाहुवाडी तालुक्यात येत आहेत.

सरूड इथं शिवसेनेची हि मुलुख मैदानी तोफ आज संध्याकाळी धडाडणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असणार आहे. याबाबत शंका नाही.