गोगवे येथील अपघातातील जखमींचे उपचारा दरम्यान निधन
बांबवडे : गोगवे येथील कारीम्शहा वाली बाबा दर्गाह जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात १ ठार व एक जण गंभीर जखमी झाले होते. त्या जखमी झालेल्यांचा आज दि.५ मार्च रोजी निधन झाले.

अपघातातील एक ठार झालेले राजाराम सखाराम पाटील वय ५० वर्षे रहाणार सावे तालुका शाहुवाडी येथील होते. तर त्याच गावातील गंभीर जखमी झालेले अनिल बंडू खोत वय ४० वर्षे यांचे आज निधन झाले.

या घटनेमुळे सावे गावावर शोककळा पसरली आहे.

पाटील व खोत कुटुंबियांच्या दु:खात साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवार सहभागी आहे.