दै.तरुण भारत चे पत्रकार सुखदेव पाटील यांना पितृ शोक: रक्षा विसर्जन बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी
बांबवडे : शिवारे तालुका शाहुवाडी येथील दैनिक तरुण भारत चे पत्रकार सुखदेव पाटील यांचे वडील तुकाराम धोंडीबा पाटील बारगीर यांचे आज दि.६ मार्च २०२३ रोजी पहाटेआकस्मिक निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने सुद्धा त्यांना भावपूर्ण आदरांजली.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन बुधवार दि.८ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता शिवारे इथं संपन्न होणार आहे.