शिंपे सेवा संस्थेच्या विजयाचा गुलाल अजित आप्पा व सहकाऱ्यांना लावणारच – श्री संपत पाटील
बांबवडे : एप्रिल २०२३ ला होणाऱ्या शिंपे तालुका शाहुवाडी येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीत शिंपे येथील संपत पाटील आणि सहकारी मंडळी ठामपणे उदय सह. साखर कारखान्याचे संचालक अजित गुंगा पाटील उर्फ आप्पा यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विजयाचा गुलाल उधळल्या शिवाय राहणार नाही, असे मत येथील संपत पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

शिंपे येथील ज्योतिर्लिंग वी.का.स सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. या निवडणुकीत उदय साखर चे संचालक अजित पाटील हे त्यांच्या पॅनेल चे नेतृत्व करीत आहेत. सेवा संस्थेच्या माध्यमातून आप्पा यांनी शेतकऱ्यांना केडीसिसी बँकेच्या वतीने कर्ज वाटप केले आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्याला सहकार्य करण्याची दानत त्यांनी आजवर दाखवली आहे. म्हणूनच पडत्या काळात शेतकऱ्याला सहकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत. असेही श्री संपत पाटील यांनी सांगितले.

संपत पाटील हे शिंपे येथील तरुण नेतृत्व आहे. त्यांनी वयैक्तिक रित्या स्वखर्चाने समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केले आहे. शाळेच्या बाबतीत असो, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो, त्यांनी आर्थिक योगदान समाजासाठी दिले आहे. हे सगळे करीत असताना, कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी त्यांनी करून घेतली नाही. तरीदेखील आपल्या पडत्या काळात समाजासाठी राबणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे आपल्यासोबत त्यांनी सहकाऱ्यांचे मोहोळ जमा केले आहे. अशा दातृत्वशील युवा नेतृत्वाच्या पाठीशी अनेक मंडळी उभी आहेत. या गोष्टी जरी उघड नसल्या, तरी त्यांनी केलेली मदत सामान्यवर्ग विसरू शकत नाही.

यामुळेच श्री संपत पाटील यांचे सहकार्य श्री अजित पाटील यांना मोलाचे ठरणार आहे, यात शंका नाही.