आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली गरजेचे – प्राचार्य सचिन जद सर
बांबवडे : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, संचलित यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली, तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर, येथे सन २०२३ – २४ शैक्षणिक सालासाठी प्रवेश सुरु झाले आहेत. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्याचबरोबर गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केल्यास, संपूर्ण शैक्षणिक फी भरल्यास, आपल्या पाल्यास मिळणाऱ्या स्टेशनरीवर ५० % सवलत मिळेल. तेंव्हा पालकांनी त्वरा करा, व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन अकॅडमी चे प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी केले आहे.

इथ प्ले ग्रुप पासून इयत्ता दहावी पर्यंत प्रवेश सुरु आहेत.

यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज, पन्हाळा, शाहुवाडी, शिराळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची पर्वणी घेवून आली आहे.

शाळेची वैशिष्ठ्ये :
१.संपूर्ण शाळा डिजिटल असून, इयत्ता सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना ( JEE, CET व NEET ) चे फौंडेशन कोर्स मोफत दिले जाणार आहेत.
२.शाळेतील सर्व शिक्षकवृंद उच्च शिक्षित असून, दहा वर्षांपेक्षा अधिक अनुभवी आहेत.
३.दहावीचा निकाल १०० % लागत आहे. तसेच ८५ % विद्यार्थी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत आहेत.
४.शाळेमध्ये सुसज्ज संगणक कक्ष व विज्ञान प्रयोगशाळा आहे.
५.शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ५ हजार पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह असलेले ग्रंथालय आहे.

६.इथं विविध स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी करून घेतली जाते. उदा. स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवी ची नवोदय च्या परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाते. तसेच एम टी एस, एन टी एस , तसेच ग्रीन ऑलंपियाड इ.
७ इथं विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्ग खोल्या आहेत.
८ प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत ट्युशन दिली जाते.
९ विद्यार्थ्यांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा कौशल्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
१० विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दृष्ट्या विशेष लक्ष देवून मार्गदर्शन केले जाते.

११ स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी विशेष एमपीएससी, युपीएससी साठी मार्गदर्शक शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे.
१२ विद्यार्थ्यांचा क्रीडाविषयक दृष्टीकोन वाढविण्यासाठी १५ पेक्षा जास्त वयैक्तिक खेळांचे प्राविण्य मिळवणाऱ्या अनुभवी शिक्षकांकडून नियमित मार्गदर्शन केले जाते. विशेषत: ऑलीम्पिक मधील समाविष्ट असणाऱ्या खेळांचे दररोज मार्गदर्शन केले जाते. उदा. आर्चरी ( धनुर्विद्या ) , रायफल शुटींग, स्केटिंग, थाळी फेक, गोळा फेक, भालाफेक, कराटे, कुस्ती, मल्लखांब, चेस, टेबल टेनिस इ.
१३ विद्यार्थी व पालकांसाठी प्रत्येक महिन्याला पालक व विद्यार्थी अभिमुकता चर्चासत्र आयोजित केले जाते.
१४ परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठता यावी, यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका मुंबई परीक्षा महामंडळ यांच्याकडून मागविल्या जातात.
१५ प्रत्येक महिन्याला फक्त १२०० ते २००० रु.अनुक्रमे इतक्याच प्रमाणामध्ये शैक्षणिक फी आकारणी केली जाते.
१६ पन्नास पेक्षा जास्त विविध उपक्रमांचे नियमित नियोजन व मार्गदर्शन केले जाते. उदा. चित्रकला, आर्ट, क्राफ्ट, फॅशन डिझायनिंग, मेहंदी, रांगोळी अशा विविध कलांचे मार्गदर्शन नियमित केले जाते.
१७ श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली संस्थेच्या एकूण ४० पेक्षा अधिक शाखा कार्यरत आहेत.

तेंव्हा आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी ९३०७१४०२३२, ८९९९४१८५२४, ८२०८९१९३४०, ९८३४८०३२३६ या क्रमांकांवर संपर्क करा, असे आवाहन प्राचार्य सचिन जद सर यांनी केले आहे.