ग्रामपंचायत विकासकामांसाठी ठराव देत नसलेबद्दल सदस्याचेच उपोषण
बांबवडे : ग्रामपंचायत प्रशासनाकडून विकासकामांसाठी आवश्यक असलेले ठराव मिळत नसलेच्या निषेधार्थ त्याच ग्रामपंचायत सदस्याने दि. ६ मार्च २०२३ पासून उपोषण आरंभिले आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य विश्वराज सुरेंद्र पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे.
याबाबत निवेदनातून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, ग्रामपंचायत सरूड मध्ये एकूण पंधरा जागा व सरपंच पदासाठी सार्वार्त्रिक निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाहित पंधरा जागा आमदार सत्यजित पाटील सरुडकर गटाने जिंकल्या, व एक जागा अपक्ष उमेदवार विश्वराज सुरेंद्र पाटील यांनी स्वत: जिंकली, व विजयी झाले.
दरम्यान ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेने गावात विविध विकासकामे येवून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, या अपेक्षेने त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे ठरावांची मागणी केली. परंतु कोणत्या न कोणत्या कारणांमुळे ग्रामपंचायत प्रशासनाने आजतागायत ठराव देण्यास टाळाटाळ केली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करणे, हे सदस्याचे कर्तव्य असते. परंतु प्रशासन ठराव देण्यास का विरोध करीत आहे. असा प्रश्न विश्वराज पाटील करीत आहेत. त्यामुळे ठराव देत नसलेच्या विरोधात विश्वराज पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.
सध्या आपल्या पाठीशी कोणी नसले, तरी भविष्यात विकासकामांसाठी जनता आपल्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी फोनवरून बोलताना सांगितले.