वरेवाडी त लोकनियुक्त सरपंच,उपसरपंच,सदस्य सत्कार सोहळा मा.आम. सत्यजित पाटील यांच्या हस्ते संपन्न
बांबवडे : वरेवाडी तालुका शाहुवाडी इथं लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार सोहळा माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, रणवीरसिंग गायकवाड सरकार यांच्या हस्ते संपन्न झाला.

वरेवाडी ते खोतवाडी सुमारे २ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये खर्चाचा रस्ता पूर्ण झाला असून, त्याचे लोकार्पण माजी आमदार सत्यजित पाटील तसेच केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान, सभापती पारळे, खुटाळवाडी सरपंच सुदाम चव्हाण, खोतवाडी सरपंच नामदेव खोत, वरेवाडी, कुंभारवाडी लोकनियुक्त सरपंच आनंदा भोसले, उपसरपंच ज्योती दीपक पोवार, सदस्य कृष्णा भोसले, बाबासो बोरगे, जयश्री बोरगे, सुनील बोरगे, संदीप वरे, प्रकाश खोत, शिवाजी बोरगे, वसंत खोत, बाळू खोत, अंकुश खोत, गणेश वरे,अनिल खोत, भिवा वरे आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.