वाकुर्डे खुर्द गावात उमटला माणुसकीचा झरा : जळीतग्रस्त गरीब कुटुंबाला दिला आर्थिक मदतीचा हात
शाहुवाडी प्रतिनिधी (संतोष कुंभार ) :
संकटात दिलेला आधार हा संकटग्रस्त कुटुंबाला खूप मोलाचा असतो . अशीच एक माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना वाकुर्डे खुर्द तालुका शिराळा येथे घडली . गावातील गरीब कष्टकरी मातंग समाजातील सर्जेराव यशवंत घेवदे यांच्या जनावरांच्या शेडला आग लागली . आणि पाहता, पाहता जनावरांसह सर्वकाही आगीच्या भक्षस्थानी पडलं . या कुटुंबाला आधार देण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि युवक व वाकुर्डे खुर्द पंचक्रोशीतील अनेक दातृत्वाचे हात सरसावले, आणि त्यातूनच मदतीचा धनादेश या गरीब कुटुंबाला दिला गेला .

वाकुर्डे खुर्द येथील सर्जेराव यशवंत घेवदे व त्यांची पत्नी शालन सर्जेराव घेवदे हे दांपत्यं मातंग समाजातील गरीब प्रामाणिक आणि कष्टाळू जीवन जगणारे . अत्यंत मेहनतीने आपला संसार गाडा चालवण्यासाठी त्यांनी जनावरांचा सांभाळ केला होता . दुर्दैवानं चार दिवसांपूर्वी त्यांच्या शेडला आकस्मिक आग लागली. भर दुपारची वेळ, भडकती आग, शेडमध्ये असलेल्या जनावरांची जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड . आणि आग विझवण्यासाठी ग्रामस्थांचा चाललेला आटापिटा. सर्वत्र चिंता भीतीच वातावरण पसरल होतं . बघता बघता आगीनं रुद्र रूप धारण केलं . आणि डोळ्यादेखत जनावरं आगीच्या भक्ष स्थानी पडली . धडपडून मेलेली जनावर बघून घेवदे कुटुंबीयांच्या डोळ्यातून अश्रूंचे पाट वाहू लागले . तर ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होऊ लागली . गरीब कष्टकरी कुटुंबावर कोसळलेल्या या भीषण संकटांनं सारा गाव आणि सर्व पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होऊ लागली .

xआणि उमटला मदतीचा झरा X
गावातील एका गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला .त्याला मदत करण्याच्या भावनेतून गावातील ज्येष्ठ नागरिक युवक यांनी आवाहन केलं. आणि बघता बघता गावासह परिसरातील अनेक दातृत्वानी मदतीचा हात पुढे केला. .या संकटात सापडलेल्या घेवदे कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश देऊन आजही एकी आणि माणुसकीचं दर्शन वाकूर्डे खुर्द गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिले .

गावकऱ्यांनी दिलेल्या मदतीचा हात पाहून घेवदे कुंटूबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . मात्र या आधाराने संकटात दिलेला आधार हा त्या संकटावर मात करण्यासाठी एक नवी उभारी देणारा असतो . आणि गावातून एकीचा आणि माणुसकीचा संदेश देण्याचा युवक आणि नागरिकांचा हा संदेश नक्कीच प्रेरणादायी आहे .