शिराळा येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल च्यावतीने महिला दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा येथे स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शिराळा तालुका समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रूपाली अजित शिंदे व आशा स्वयंसेविका यांचा सत्कार प्राचार्या सौ मीनाक्षी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

या जागतिक महिला दिनानिमित्त शिराळा शहरातील तळागाळापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका, सुपरवायझर व नर्सिंग कर्मचारी वृंद यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नर्सिंग कर्मचारी वृंद सौ. रुपाली गुरव, आशा सुपरवायझर सौ.सुनीता कुंभार, आशा स्वयंसेविका सौ. प्रियांका शिंदे, सौ. नीता गायकवाड आदींचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेशमा जाधव यांनी केले. मनोगत डॉ. रूपाली शिंदे, सौ. मीनाक्षी कदम यांनी व्यक्त केलेत.

यावेळी सौ नम्रता पाटील सौ पौर्णिमा धनवडे कुमारी मयुरी घाटगे सौ उज्वला कदम आदी शिक्षिका व स्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेजचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार संस्थापक अध्यक्ष संदीप कदम यांनी मांनले.