आमदारांच्या आश्वासनानंतर सरूड येथील विश्वराज पाटील यांचे उपोषण मागे
बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी इथं ग्रामपंचायत सदस्य विश्वराज पाटील यांनी दि.६ मार्च रोजी आरंभ केलेले आमरण उपोषण विद्यमान आमदार विनय कोरे यांनी त्यांचा हा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहचवून निधी आणण्यासाठी ठराव देण्यास सहकार्य करू, असे आश्वासन दिल्यानंतर आपले उपोषण दि.७ मार्च रोजी मागे घेतले.

विश्वराज पाटील हे एकमेव अपक्ष सदस्य ग्रामपंचायत सरूड मध्ये आहेत. त्यांनी विकास कामे आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे ठराव देण्याची मागणी करीत होते. प्रशासन त्यांना सहकार्य करीत नव्हते. त्याच्या निषेधार्थ विश्वराज यांनी सरूड एसटी स्टँड चौकात आमरण उपोषण सुरु केले होते.

गावातील या घटनेमुळे आमदार डॉ. कोरे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली, आणि संबंधितांवर योग्य कारवाई करून ठराव देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्यानंतर लगेच उपोषण मागे घेतले.