केंद्रशासनाच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाचे बांबवडे त मुंडण आंदोलन
बांबवडे : केंद्रशासनाच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघ च्या वतीने बांबवडे इथं मुंडण आंदोलन करण्यात आले.

घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची अवाजवी अन्यायी महागाई, शेतकरी, कष्टकरी मजूर, कामगार, व सर्वसामान्य जनतेला महागाई च्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे म्हणाले कि, नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी, नोटाबंदी सारख्या निर्णयामुळे सर्व सामान्य जनता आर्थिक विवंचनेत असताना, सरकारी यंत्रणेचे खाजगीकरण करण्यात केंद्र शासन व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. निर्यात बंदी करून शेतकरी वर्गाची कुचंबना केली जात आहे. अशा सामान्य जनतेच्या विरोधात अनेक निर्णय केंद्रशासन घेत असल्याने, अशा शासनाला जाग आणण्यासाठी आज हे मुंडण आंदोलन केले जात आहे.

यावेळी अनिरुद्ध गौतम कांबळे, दयानंद शिवजात, पार्थ कांबळे आदींनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी ए.व्ही.नलावडे, पोलीस उपनिरीक्षक पांढरे यांना या आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर आकाश कांबळे, संतोष कट्टे, चंद्रकांत काळे, विल्सन घोलप, गणेश कांबळे आदी मंडळींच्या स्वाक्षऱ्या आहेत.