पोलिसांची धडक कारवाई : उघड्यावर दारू पिताना एकास अटक, तर दारू पिवून वाहन चालविताना दोघांना अटक
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी पोलीस ठाण्यातील दोन गस्ती पथकाने शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगड इथं दारूबंदी असतानाही, उघड्यावर दारू पिताना, एकास अटक केली. तसेच दोघांना दारू पिवून वाहन चालविताना अटक केले आहे. शाहुवाडी पोलिसांची हि कारवाई कौतुकास्पद असून, या मोहिमेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

दरम्यान शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विशाळगड इथं उघड्यावर दारू पिताना, अस्लमअल्लाबक्ष बळगार वय २९ वर्षे यास रंगेहाथ पकडले. त्याला मा. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास २००० रुपये दंड / १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे , शहाजी भोसले, महेश भारमल आदी पोलीस कर्मचारी समाविष्ट होते.

दरम्यान दारू पिवून वाहन चालविताना अजय वसंत शिंदे वय २३ वर्षे, अशोक कोंडीबा कांबळे वय ४६ वर्षे यांना पोलिसांनी अटक केले. त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, प्रत्येकी १०,०००/- रु. दंड .दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या मोहिमेत सुयश पाटील, शिवाजी पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.