पनुंद्रे येथील महारुगड़े कुटुंबातील तिघांचे येणपे इथं निधन : मुलगा जखमी
बांबवड़े : पनुंद्रे तालुका शाहुवाडी येथील कुटुंबाचा येणपे तालुका कराड जि.सातारा येथे यात्रेसाठी जात असताना कुटुंबातील तिघांचे अपघाती निधन झाले असून, सुरेश सखाराम महारुगड़े यांच्यासहित पत्नी व् मुलगी जागीच ठार झाले असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दि.११ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिस सुत्रांकडून व् घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सखाराम महारुगड़े हे पनुंद्रे तालुका शाहुवाडी येथील आपल्या गावी यात्रेसाठी पुण्याहून रिक्षाने निघाले होते. यावेळी येणपे तालुका कराड जि. सातारा इथं सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान रिक्षा आणि ट्रॅक्टर चा अपघात झाला.

या अपघातात स्वत: सुरेश सखाराम महारुगड़े वय ३९ वर्षे, त्यांची पत्नी सुवर्णा सुरेश महारुगड़े वय ३४ वर्षे, मुलगी समीक्षा सुरेश महारुगड़े वय १३ वर्षे आशा तिघांचा जागीच मृत्यु झाला. तर मुलगा समर्थ सुरेश महारुगड़े वय १७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पनुंद्रे गावावर शोककळा पसरली आहे.