शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा दौरा

मलकापुर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांचा होळी सणाच्या अनुषंगाने दौरा केला.


होळीच्या निमित्ताने गाव गाडयातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शाहुवाडी तालुक्यामध्ये, वाड्या वस्ती वरती माजी खासदार राजू शेट्टी यांनी संपर्क दौरा केला.

गेले ३ दिवस मानोली, आंबा, केर्ले, केर्ले धनगर वाडा, घोळसवडे धावुरवाडा ,वारूळ, वालूर, जावली, करुंगळे ,अलतुर , पुसार्ळे, भेंडवडे, निनाई परळे, वाकोली, वाकोली धनगरवाडा ,लोळाणे, निळे, वीरवाडी, कडवे ,वरील गाव, म्हालसवडे, म्हालसवडे धनगरवाडा, सुका माळ धनगरवाडा, ऐनवाडी, ऐनवाडी धनगरवाडा ,खेळता धनगरवाडा ,मुसलमान वाडी, धोपेश्वर धनगरवाडा ,पांढरे पाणी, भाततळी, गेळवडे ,पारीवणे, मांजरे ,शेंबवणे, नवलाईवाडी, गावडी, कुंभवडे, गवळवाडी,अनुस्कुरा, मोसम ,आदी वाड्यावर वस्ती वर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.


मागील २०१९ च्या निवडणुकीच्या पराभवानंतर ४ वर्षाच्या काळातील आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध आंदोलनाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर सादर केला.


येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांसाठी कायम पणे त्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई चालूच ठेवू अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.


यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर,भैया थोरात, अजित साळोखे, प्रशांत मिरजकर , अवधूत जानकर, जयसिंग पाटील, अमोल महाजन, रायसिंग पाटील, संजय केळसकर ,विजय पाटील, बाजीराव सुळेकर ,राजू केसरे, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!