स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २१ मार्च रोजी शाहुवाडी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा
मलकापूर प्रतिनिधी
माजी खासदार राजू शेट्टी हे दौऱ्यानिमित्त गावा गावांमध्ये फिरत असताना जंगली प्राण्यापासून शेतीचे होणारे नुकसान त्यामध्ये भात ,सोयाबीन ,भुईमूग ,ऊस, मका आदी पिकांचे गव्या पासून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर बिबट्या, तरस, जंगली कुत्री यांच्यापासून वाड्या वस्ती वरती राहणाऱ्या शेतकरी जनतेच्या शेळ्या, मेंढ्या, म्हैशी आदी पाळीव प्राण्यांच्या वरती हल्ले होतात. याचबरोबर वीज वितरण कंपनी, रेशन याबाबत जाब विचारन्यासठी २१ मार्च २०२३ रोजी मलकापुर ते शाहुवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढ़न्यात येणार आहे. यासाठी शेतकरी वर्गासाहित जनतेने मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाड्यावर रेशनची सुविधा नसल्याचे ही आढळून आले, रेशन कार्ड कायमची बंद केली असल्याचे निदर्शनास आले,

ऑनलाइन नावे दिसून येत नाहीत, नावे ऑनलाईन नोंद करूनही अद्याप युनिट प्रमाणे धान्य मिळत नाही असेही आढळून आले. विजेची बिले विना मीटर रिडींग न घेता मोघम बिले दिली जातात, डिपी, फ्युजा जळालेल्या अवस्थेत आहेत, ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे, शेती वाळून जात आहे. या पद्धतीने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिसुन आला. त्यासाठीच येत्या २१ मार्च रोजी सकाळी ११ वा. विठ्ठल मंदिर मलकापूर ते तहसिल कार्यालय शाहूवाडी येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.